Thursday, May 13, 2010

वाट


आज जशे पावुल पडले माझे ऑफिस बाहेर
एक आश्रुनी गाल ओला केला
ह्रदय हसून म्हणे ते दिवस गेले
तुझा तो सुखाचा वेळ आता गेला

आनंदी माणुस वेळ का विसरतो
दिवस कशे गेले समजलो मी नाही
एक मित्र पेक्शा जास्त कोणी मिळाल
स्वप्नच आहे का हे काही ?

सगळा एकटेपणा दूर केला
केवढा सगळा आनंद दिला
तुमच्या शिवाय मन लागत नाही
का हो, असा का त्रास दिला ?

तुमची फार च सवय झाली आहे
मुळीच मन नाही लागत तुमच्या दूर
एक दिवस नाही भेटणार असे वाटले
तर मन रडेल अश्रुंचे पुर

का असा जादूटोना केला ?
माझे होणार तर नाही माला ठावुक आहे
तरी एक छोटी शी आशा ठेवून
मन सारखी तुमचीच वाट पाहे

--संकेत करकरे
11 May 2010

1 comment:

Priyanka said...

very touching poem.... nice one...